नांदेड, बातमी24ः नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या घरी बैलपोळयाच्या संध्येला गोड पाहुणीचे आगमन झाले. याचसोबत जिल्हाधिकार्यांनी आदर्श घालून दिला. पत्नीचे प्रसूती हवे त्या खासगी अशा अलिशान रुग्णालयात करू शकले असते. परंतु शाम नगर येथील शासकीय महिला व बाल रुणालयात प्रसूती करून घेतली. शासनाच्या रुग्णालयाविषयी सामान्यांच्या मनात विश्वास वाढविण्याचे काम डॉ. इटनकर यांनी केले.
मध्यम वर्गीय, नौकरदार वर्ग, व्यापारी माणूस उपचारासाठी कधीही रुग्णालयात जात नाही. अलिशान अशा महागडया रुग्णालयात उपचार घेत असतात. यास मात्र जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची पत्नी ही अपवाद ठरली आहे. मागच्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी डॉ. इटनकर हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे. काम करण्याचा त्यांचा उद्देश ही चांगला राहिला आहे. मात्र कोरोनाचे संकट एकटया-दुकटयाचे राहिले, नसून ती आता समाजाची जबाबदारी व खबरदारी बनली आहे.
——
प्रत्येक अधिकार्यांनी आदर्श घ्यावा
शासन योजना व सुविधा या सामान्यांसाठी आहेत. हे नक्की असले, तरी या योजनांवर किंवा सुविधांबाबत अधिकार्यांनी जागरूक राहून उपचार व सेवा घेतल्यास संबंधित यंत्रणा ही जबाबदारीने काम करते. हेच काम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नीची प्रसूती शासकीय रुग्णालयात करून घेत आदर्श घालून दिला.
——
सुशील खोडवेकर यांची आठवण
नांदेड-वाघाळा महानगर पालिकेचे आयुक्त राहिलेल्या सुशील खोडवेकर हे नांदेड येथे आले असताना शासकीय निवासस्थान मिळाले नव्हते. तेव्हा ते घरकुल योजनेच्या घरात राहिला गेले होते.