नांदेड, बातमी24ः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकल्याण आयुक्तांच्या आस्थापनेवरील वर्ग एक अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवार दि. 17 ऑगस्ट रोजी निघाले. यात जिल्हापरिषद समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या बदलीचा सुद्धा समावेश असून त्यांची बदली उस्मानाबाद जातपडताळणी संशोधन अधिकारी म्हणून झाली आहे. मात्र शासनाने नांदेड येथील पद रिक्तच ठेवले आहे. त्यामुळे पुढील काळात हे पद सुद्धा प्रभारी अधिकार्यांवर चालवावे लागणार आहे.
समाजकल्याणच्या गट अ संवर्गातील नऊ अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.यात अकोला सहाय्यक आयुक्त असलेले एन.एम. यावलीकर यांची चंद्रपुर सहाय्यक आयुक्त या रिक्त पदावर, चंद्रपुर समाजकल्याण सहाय्यक आयुक्त असलेल्या पी.जी कुलकर्णी यांची जिल्हापरिषद समाजकल्याण या रिक्तपदावर, पुणे सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड यांची समाजकल्याण सहाय्यक आयुक्त (शिक्षण) या रिक्त पदावर बदली झाली आहे. लातूर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बी.जी.अरवत यांची उस्मानाबाद सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्या रिक्त होणार्यावर पदावर, तर चिकुर्ते हे अरवत यांच्या लातूर येथील रिक्त होणार्या जागी सहाय्यक आयुक्त असणार आहेत.
प्रदीप भोगले हे पुणे संशोधन अधिकारी (नाहस) समाजकल्याण आयुक्त कार्यालयात होते. त्यांची बदली जालना जातपडताळणी समिती येथे संधोधन अधिकारी म्हणून झाली. नांदेड जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी एस.व्ही. आऊलवार यांची उस्मानाबाद जात पडताळणी संधोधन अधिकारी या रिक्तपदावर बदली करण्यात आली. परभणी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी श्रीमती एस. के. भोजने यांची श्री. भोगले यांच्या रिक्त झालेल्या पुणे संशोधन अधिकारी (नाहस),यांच्या रिक्तपदावर होणार आहे. तर बीड जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी आर. एच. येडके यांची परभणी जिल्हापरिषद समाजकल्याण अधिकारी या रिक्त पदावर बदली झाली आहे.
——
आऊलवार यांची एकतफ र्ी बदली
लॉकडाऊनच्या काळात सामाजिक दातृत्वातून भुकेल्यांसाठी अन्नछत्रालय, रुग्णालयात काम करणार्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट, अंध-अपंगासाठी घरपोच भाजीपाला व गरजूंना मदतीचा हातभार लावून मोठी वाव्हा मिळविणारे सत्येंद्र आऊलवार यांची बदली होणार होती. हे मात्र जवळपास निश्चित मानले जात होते.