नांदेड,बातमी24:- बुधवारी पुन्हा कोरोनाच्या संख्येने मागचे उचाकी आकडा मोडीत काढत नवा उचाक मांडला, असून 230 रुग्ण कोरोनाचे आले आहेत. सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर 139 जनांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बुधवार दि.19 रोजी 1हजार 159 चाचण्या करण्यात आल्या. 887 अहवाल निगेटिव्ह आले,तर 230 अहवालामध्ये अंटीजन चाचणीत 144 व आरटी पीसीआर चाचणीत 84 पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4 हजार 555 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 2 हजार 700 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बुधवारी आलेल्या अहवालात सर्वाधिक रुग्ण नांदेड शहरात 116 सापडली.धर्माबाद 16, लोहा 11 इतर तालुक्यातील संख्या एक अंकी अशी आहे.
——-
प्रत्येकी 3 महिला व पुरुषाचा मृत्यू
लोह येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि.18 रोजी ,विष्णुपुरी येथील 52 वर्षीय महिलेचा दि.18 रोजी,आनंद नगर येथील 43 वर्षीय महिलेचा दि.19 रोजी, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 60 वर्षीय महिलेचा दि.19 रोजी,विष्णुपुरी येथील 54 वर्षीय पुरुषाचा दि.19 रोजी,तर वजीराबाद येथील 84 वर्षीय पुरुषाचा 19 आशा जणांचा मृत्यूमुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 159 झाली,तर 1 हजार 666 रुग्ण उपचार घेत असून यात 175 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.