नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्या बघता-बघता पाच हजार पार झाली आहे. जिल्ह्यातील 183 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 168 जणांना सुट्टी देण्यात आली.
रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी 452 नमूने तपासण्यात आले. यात 351 अहवाल निगेटीव्ह आले तर 89 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 32 तर अंटीजन चाचणीत 57 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 5 हजार 32 झाली. तर 3 हजार 215 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रविवारी सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.यात माहूर तालुक्यातील वजरा शेख येथील 90 वर्षीय महिलेचा माहूर येथील रुग्णालयात दि.22 रोजी मृत्यू,नांदेड येथील नई आबादी येथील 62 वर्षीय पुरुषाचा दि. 22 रोजी,सिडको येथील आंबेडकर नगर येथील 70 वर्षीय पुरुषांचा दि.22 रोजी,बळीरामपूर येथील 47 वर्षीय महिलेचा दि.22 रोजी, मदिना नगर येथील 72 वर्षीय पुरुषाचा दि.23 रोजी तर पावडेवाडी येथील 63 वर्षीय पुरुषचा दि.23 रोजी मृत्यू झाला, असे जिल्ह्यातील 183 जण आतापर्यंत मृत्यू पावले आहेत.