नांदेड, बातमी24ः मागच्या चौविस तासांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. 126 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 240 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. तर 181 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
मंगळवार दि. 25 रोजी 700 नमूने तपासण्यात आले. यात 547 नमूने निगेटीव्ह तर 126 जणांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 56 व अंटीजनमध्ये 70 रुग्ण असे एकूण रुग्ण संख्या 5 हजार 276 झाली आहे. यात 3 हजार 538 जणांची कोरोनातून मुक्ती झाली आहे. आजघडिला 1 हजार 510 जणांवर उपचार सुरु आहेत.यातील 181 जणांची प्रकृती गंभीर आहे.
——
चार जणांचा मृत्यू
कंधार तालुक्यातील नवरंगपुर येथील 55 वर्षीय पुरुषाचा दि. 25 रोजी, अर्धापुर तालुक्यातील मालेगाव येथील 60 वर्षीय महिलेचा दि.25 रोजी, बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि. 25 तसेच किनवट येथील 52 पुरुषाचा दि. 25 रोजी असे आतापर्यंत 192 जण मरण पावले आहेत.