नऊ जणांचा मृत्यू ; 214 जणांची प्रकृती गंभीर

नांदेड

नांदेड,बातमी24: – बुधवार दि.26 रोजी नऊ जणांचा मृत्यू झाला. 154 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाली. 148 बाधित रुग्णांची भर पडली. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 102 बाधित आले.

आजच्या एकुण 480 अहवालापैकी  313 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 640 एवढी झाली असून यातील 3 हजार 894 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 503 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत. तसेच 214 बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

मंगळवार 25 ऑगस्ट 2020 रोजी गुरुद्वारा परिसर नांदेड येथील 55 वर्षाचा एक पुरुष यांचा खाजगी रुग्णालय, नांदेड येथे तर बुधवार 26 ऑगस्ट, 2020 रोजी देगलूर तालुक्यातील करडखेड येथील 58 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे, नगीनाघाट नांदेड येथील 67 वर्षाचा एक पुरुष व सिडको नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे तर लोहा येथील 70 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे, गुरुवार 27 ऑगस्ट 2020 रोजी धर्माबाद तालुक्यातील धानोरा येथील 65 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 76 वर्षाचा एक पुरुष यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे वसंत नगर नांदेड येथील 40 वर्षाची एक महिला , रवीनगर नांदेड येथील 65 वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.