नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या खळबळ उडविणारी ठरली आहे. तब्बल 443 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.तर आइ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7 हजार 850 एवढी झाली आहे.
गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी 1 हजार 809 जणांची तपासणी करण्यात आली. यात 1 हजार 297 अहवाल निगेटीव्ह आले तर 443 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 128 तर अंटीजन चाचणीत 315 पॉझिटीव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यताील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7 हजार 850 तर 224 जणांची कोरोनातून मुक्ती झाल्याने आतापर्यंत 5 हजार 1 रुग्ण घरी परतले आहेत. सध्या 2 हजार544 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील 246 जणांची प्रकृती गंभीर आहे.
आजच्या 443 जणाचं रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. यात नांदेड शहरातील 238 जण आहेत. नांदेड ग्रामीणमधून 24, लोहा-37, हदगाव-14, मुदखेड-13, माहूर-9, हिमायतनगर-9, धर्माबाद-8 यानंतर इतर तालुक्यातील कधी-अधिक एकेरी आकडेवारी आहे.
अडीचशे जणांचा मृत्यू
किनवट तालुक्यातील बेलमपुर येथील सत्तर वर्षीय महिला दि.2 रोजी, जुना मोंढा येथील 75 पुरुषाचा दि. 2 रोजी, अक्सा कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुषाचा दि. 2 रोजी, गोकुळ नगर येथील 75 वर्षीय पुरुषाचा दि. 2 रोजी, किनवट तालुक्यातील बोधडी येथील महिलेचा दि. 2 रोजी, लोहा येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि. 2 रोजी, बोरबन परिसरातील 81 वर्षीय पुरुषाचा दि. 1 रोजी तर कंधार तालुक्यातील ओराळ येथील 52 वर्षीय पुरुषाचा दि. 3 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 251 झाली आहे.