दीड लाख रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक अटकेत

क्राईम

 

नांदेड, बातमी24:-नांदेड तालुक्यातील रहाटी येथील ग्रामविकास अधिकारी हनुमंत वाढेकर व खासगी इसम बालाजी वाघमारे या दोघांना दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

एका तक्रारदाराचे गावठाण जमिनीचा फ्लॅट नावाने करून देण्यासाठी नमुना नंबर आठला लावून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी हणमंत वाढेकर याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती,सदरची रक्कम तक्रारदाराकडून बालाजी वाघमारे याने घेतली,असता लाचलूचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.सदरची लाच हणमंत वाढेकर यांच्या सांगण्यावरून घेतल्याची कबुली वाघमारे याने दिली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई राजेश पुरी,कपिल शेळके,एकनाथ गंगातीर्थ,दर्शन यादव,घोडके, बोडके यांच्या पथकाने केली.