नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीनशे ते साडे तिनशे अशी होती. बुधवार दि.9 रोजी रुग्णसंख्या चारशेपार झाली आहे.चार जणांचा मृत्यू तर 246 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहे.
मागच्या चोवीस तासांमध्ये 1 हजार 461 जणांची तपासणी करण्यात आली.यामध्ये 990 निगेटिव्ह तर 408 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटी पीसीआर चाचणीत 132 तर अँटीजन चाचणीत 276 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णाची संख्या 9 हजार 986 एवढी झाली. आतापर्यंत 6 हजार 363 जणांची कोरोनावर मात केली आहे.सध्या 3 हजार 232 जणांवर उपचार सुरू असून यात अतिगंभीर रुग्णांची संख्या 39 एवढी आहे.
——
सर्वाधिक रुग्ण नांदेड शहरात
नांदेड शहरात सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरात आले,असून येथील रुग्ण संख्या दोन्ही 191 एवढी आली,त्यानंतर नायगाव तालुक्यात 50, मुदखेड 29,मुखेड 26, बिलोली-14, नांदेड ग्रामीण 21,उमरी 20 अशी सर्वाधिक संख्या नोंदविली गेली आहे.
——–
चार जणांचा मृत्यू
किशोर नगर येथील 52 वर्षीय महिलेचा दि.8 रोजी,कंधार येथील विजयगड येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि.9 रोजी,नांदेड तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील 48 वर्षीय महिलेचा दि.8 रोजी तर गणेश नगर येथील 72 वर्षीय महिलेचा दि.9 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 280 एवढी झाली आहे.