नांदेड, बातमी24ः नांदेडच्या पॉलिटीकल मॅनेजमेंटमध्ये टॉपर असलेले विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांची पुण्यात मास्कवरून नाचक्की झाल्याची समोर आली आहे. संतापलेल्या आमदार राजूरकर यांनी पुणे येथील महापालिका कर्मचारी व पोलिसांची बघून घेतो,अशी धमकीवजा इशारा देत नांदेडकडे रवाना झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अमर राजूरकर व त्यांचे तीन सहकारी व चालक पुणे येथील कोथरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शास्त्रीनगर चौकातून जात होते. या वेळी त्या अलिशान (एमएच.26बीआर 5999) या गाडीमधील कुणीही मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी थांबण्यास सांगितले. मात्र पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत गाडी भरधाव वेगाने पुढे घेऊन गेले. या वेळी पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत अडविले.
महापालिकेच्या कर्मचार्यांनी विनामास्क फि रत असल्याचे निदर्शेनास आणून दिले. या वेळी चालकाने गाडीत आमदार आहेत. आमदारांना मास्क विचारता म्हणत दमदाठी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी महापालिकेच्या अधिकार्यांनी नियम सर्वांना सारखे असून यास कुणीही अपवाद नसल्याचे सांगितले. या वेळी पोलिसांसोबत आमदार राजूरकर यांची सुद्धा बाचाबाची झाली. मात्र पोलिसांनी पाचशे रुपयांचा दंड भरूनच गाडी सोडून दिली. या सगळया प्रकारामुळे नांदेडच्या आमदाराची मास्कवरून पुण्यात नाचक्की झाल्याची चर्चा नांदेडमध्ये विरोधकांकडून चर्चेली जात आहे.