नांदेड, बातमी24ः कोरोनावर मात केलेल्या सर्वाधिक रुग्णांची नोंद शनिवारी झाली आहे. यात 377 रुग्ण बरे झाले आहेत. आठ जणांच्या मृत्यूच्या नोंदीसह एकूण मृत्यांची संख्या तिनशे पार झाली.नव्याने 384 जण हे कोरोना बाधित झाले आहेत. तसे
शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी 1 हजार 552 जणांची चाचणी करण्यात आली. 1 हजार 144 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 384 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 122 व अंटीजनमध्ये 262 जणांचा समावेश आहे. आतापर्यंतची कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11 हजार 93 एवढी झाली आहे. यातील 6 हजार 869 जण बरे झाले आहेत. आजमितीस 3 हजार 868 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
384 जणांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरात सापडले आहेत. यात नांदेड शहरात 234 जणांचा समावेश आहे. बिलोली-23, मुखेड-14, नायगाव-17, मुदखेड-12, लोहा-13, उमरी-19 अशी रुग्ण संख्या आली आहे.
——-
आठ जणांचा मृत्यू
हदगाव तालुक्यातील तामगाव येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि. 10 रोजी, नांदेड शहरातील साईनगर येथील 48 वर्षीय महिलेचा दि. 11 रोजी, सिडको येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि. 12 रोजी, लोहा येथील इंदिरानगर येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि. 12 रोजी, देगलूर तालुक्यातील नरंगल येथील 41 वर्षीय महिलेचा 41वर्षीय महिलेचा दि. 11 रोजी, उस्माननगर येथील 83 वर्षीय महिलेचा पुरुषाचा दि. 11 रोजी, दीपनगर येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि. 12 रोजी तर तरोडा नाका येथील 74 वर्षीय पुरुषाचा दि.12 रोजी मृत्यू झाला, असे आतापर्यंत 303 जण दागावले आहेत.