नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाने नोंदविली आहेत. त्याचसोबत 236 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 53 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
मागच्या चौविस तासांमध्ये 1 हजार 41 जणांची तपासणी करण्यात आली. यात 875 जणांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह आला आहे. 236 जणांचा जण हे कोरोना संसर्ग बाधित आले आहेत. यासह जिल्हयात कोरेानाच्या रुग्णांची संख्या 14 हजार 436 एवढी आहे. दिवसभराच्या काळात 267 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 10 हजार 450 एवढी आहे. सध्या 3 हजार 537 जणांवर उपचार सुरु आहेत.
——-
सात जणांचा मृत्यू
लोहा तालुक्यातील 75 वर्षीय पुरुषाचा दि.23 रोजी, नांदेड येथील एकता नगर भागात राहणार्या 70 वर्षीय पुरुषाचा दि. 23, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 24 तरुणाचा दि. 23 रोजी, धर्माबाद येथील 61 वर्षीय पुरुषाचा दि. 23 रोजी, नांदेड येथील बसवेश्वर नगर भागात राहणार्या 72 वर्षीय पुरुषाचा दि. 23 रोजी, नांदेड येथील मानस नगर येथील महिलेचा दि. 23 रोजी तर किनवट येथील 60 वर्षीय महिलेचा दि. 24 रोजी मृत्यू झाला.