विष्णपुरी धरणाचे पुन्हा दहा दरवाजे उघडले

नांदेड

नांदेड, बातमी24ः- जायकवाडी प्रकल्पातून पर्जन्यमानात वाढ झाल्याने 37 हजार 800 क्ससेक्यने विसर्ग गोदावरी नदी पात्रात होत आहे. हे पाणी विष्णपुरी जलाशयात पोहचले आहे. त्यामुळे विष्णुपुरी जलाशयाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी या धरणातून 2 हजार 770 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रशासनाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले, की सध्या जायकवाडी, त्याचसोबत निम्न दूधना प्रकल्पातून 1 हजार 800 माजलगाव प्रकल्पातून 4 हजार 800, पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर पाणलोट प्रकल्पातून पूर्णा नदीत 12 हजार 200 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीत मिळते.या सगळया पाण्याचा विसर्ग हा 56 हजार 600 क्युसेक्यने सुरु आहे.

सध्या तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणे हे 98 टक्के भरले आहे. हे धरणे शंभर टक्के भरल्याने असून या धरणातून दीड लाख क्युसेक्सने खाली विसर्ग सुरु आहे. विष्णुपुरी जलाशयावरील व खालचे सर्व धरणे सुद्धा भरली आहेत. यातच विष्णुपुरी जलाशयाचे दहा दरवाजे उघडल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नवाघाट पुलाला पाणी भिडले आहे.