जिल्ह्यातील रुग्णसंख्या सतरा हजार;65 जण अतिगंभीर

महाराष्ट्र

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तेव्हापासून सुरू झालेली रुग्णसंख्या गुरुवार दि.8 रोजी ही रुग्णसंख्या तब्बल 17 हजार झाली आहे.तसेच मृत्यूचा आकडा साडे चारशे झाला आहे.

आजरोजी 1 हजार 98 जणांचे नमुने तपासण्यात आले.यात 912 निगेटिव्ह तर 159 पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 17 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.तसेच 211 जणांना सुट्टी देण्यात आली,असून 13 हजार 680 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या 2 हजार 762 जणांवर उपचार सुरु आहेत.तर 65 जण हे अतिगंभीर आहेत.
——-
विसावा नगर येथील 70 वर्षीय पुरुषाचा 7 रोजी तर सिडको 85 वर्षीय दि.7 रोजी मृत्यू झाला.आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या 448 झाली.