तरूण आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू;नांदेडमध्ये सुुर होते उपचार

देश

नांदेड, बातमी24ः मुळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील उमरा गावचे रहिवासी असलेल्या सध्या तिरुपुरा केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या सुधाकर शिंदे यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्रवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. सुधाकर शिंदे हे सन 2015च्या बॅचचे आयएएस अधिकारी होत. मृत्यूसमयी ते 35 वर्षांचे होते.

मयत सुधाकर शिंदे हे सुट्यांच्या निमित्ताने दोन आठवडयापूर्वी कुटुंबियासह गावी आले होते. येथे आल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर नांदेड येथील श्री. गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.तबियत सुधारत असताना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. औरंगाबादवरून पुणे येथे घेऊन जाण्यात आले. तेथील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना शुक्रवार दि. 9 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.

मयत सुधाकर शिंदे हे तिरुपुरा येथे सहसचिव अर्थ मंत्रालयात कार्यरत होते. सन 2015 च्या बॅचमध्ये त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. शालेय शिक्षण परभणी येथील नवोदय विद्यालयात शिक्षण झाले. औरंगाबाद येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीकडे वळले. पुणे व नंतर दिल्ली येथून अभ्यास आयएएस मिळविले.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी, वडिल चार भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे.