अभिमन्यू काळे अन्न व औषध प्रशासन आयुक्त

महाराष्ट्र

मुंबई,बातमी24ः राज्यातील पंधरा सनदी अधिकार्‍यांच्या आदेश शासनाने काढले आहेत.यात अभिमन्यू काळे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असणार आहे. अभिमन्यू काळे हे प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कामांसाठी प्रशासनात ओळखले जातात.
काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्याची आदेशाची प्रतिक्षा होती.यात नुकतेच आयएएस बहाल झालेल्या अधिकार्‍यांचा सुद्धा बदल्यांच्या आदेशात समावेश आहे. सदरची बदल्यांची यादी प्रशासनाने सोमवार दि. 19 रोजी प्रसिद्ध केली.

यामध्ये नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अभिमन्यू काळे यांनी ग्रामीण भागात अनेक यशस्वी प्रयोग राबविले होते.नांदेड येथील त्यांच्या कार्याची देशपातळीवर सुद्धा दखल घेतली गेली होती. गोदीया जिल्हाधिकारी, अन्न व नागरी पुरवठा विभागात काही काळ अवर सचिव व त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदावर ही दोन वर्षे कार्यरत राहिले. दोन वर्षांच्या काळात पर्यटन विभागात अमुलाग्र बदल घडवून आणत या महामंडळाला विशिष्ट उंचीवर आणून ठेवले.

बदलीने अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदावर काम करण्याची जबाबदारी शासनाने सोपविली,असून कोरोनासारख्या महामारीच्या काळात औषधीसंबंधी पुरवठा व व्यवस्थापनाबाबत चांगले काम करण्याची संधी असणार आहे. येणार्‍या काळात या विभागाचे आयुक्त म्हणून चांगले काम करू असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले.