नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात 171 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 111 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 20 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 91 बाधित आले.
आजच्या एकुण 1 हजार 154अहवालापैकी 1 हजार 28 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 291 एवढी झाली असून यातील 16 हजार 301 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 381 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.
या अहवालात दोघाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवार 19 ऑक्टोंबर रोजी नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील 55 वर्षाचा एका पुरुषाचा तर उमरी तालुक्यातील सावरगाव कला येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 490 झाली आहे.