नांदेड, बातमी24:- वेतनश्रेणी देण्यात यावी,या मागणीचे निवेदन घेऊन आलेल्या निम्न शिक्षकांची सीईओ वर्षा ठाकूर यांनी चांगलीच खरडपट्टी काढली, अनावश्यकपणे जिल्हा परिषदमध्ये दिसाल तर खबरदार या शब्दात शिक्षकांना खडेबोल सुनावले.
चार ते पाच दिवसांच्या जिल्हा बाहेर गेलेल्या वर्षा ठाकूर यांचे मंगळवार दि.3 रोजी आगमन झाले. विभाग प्रमुखांच्या बैठकीसाठी घाईगडबडीने जिल्हा परिषदेत येणार असल्याची माहिती काही अभ्यंगताना मिळाली. यात काही निम्न शिक्षक ही आले होते.त्यांच्या वेतनश्रेणी बाबतचे निवेदन होते.सदरचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन वर्षा ठाकूर यांनी दिले. यावेळी शिक्षकांनी प्रश्न तात्काळ मार्गी लावावा,असे म्हणतात त्या शिक्षकांवर सौ.ठाकूर या चांगल्याच भडकल्या. वेतनाची काळजी करता,तशी शाळेत शिकणाऱ्या मुलांची काळजी घ्या.रोज काय शिकविता हे मला कळवीत चला आणि यापुढे अनावश्यकपणे दिसाल तर याद राखा, या शब्दात त्या शिक्षकांना इशारा दिला. त्याच वेळी आंतर जिल्हा बदलीसंबंधी शिफारस घेऊन आलेल्या दोघांची सुद्धा खरडपट्टी काढली, नियमाप्रमाणे होणारी कामे शिफारशी घेऊन येण्याची आवश्यकता नाही, शिफारशी बाबत म्हणणे नाही,मात्र इतका पाठपुरावा करायला लावणे उचित नसल्याचे सांगत त्यांचा सुद्धा समाचार घेतला. वर्षा ठाकूर यांची कडक शिस्त आतापर्यंत अधिकाऱ्यांना माहित होती.आज शिक्षक व काही अभ्यंगताना ही कळून चुकले.