सीईओ वर्षा ठाकूर यांच्या दणक्याने कर्मचारी लाईनवर;वेळ,वेग आणि कामाची लावली शिस्त

नांदेड

नांदेड,बातमी24:- कामाच्या बाबतीत कठोर शिस्त स्वतःपासून पाळणाऱ्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी वेळेवर न येणाऱ्या कर्मचार्यांना चांगला एक दिवसाच्या पगार कपातीचा हिसका दाखवताच दोन दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी लाईनवर आल्याचे बघायला मिळत आहेत.

दोन महिन्याच्या कालावधीत वर्षा ठाकूर यांनी कार्यालयीन शिस्त,कामात नियमितता,झिरो पेंडसी अशी कामाची सूत्री आखत असताना कर्मचऱ्याना वेळेत सेवेवर आणण्याचे भान त्यांनी वेळोवेळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्षा ठाकूर यांनी स्वतः वेळेत येत असताना तशी वेळेत येण्याची तंबी कर्मचऱ्याना सुद्धा दिली,यासाठी त्या अधूनमधून विभागवार दौरे करत असतात, दोन दिवसांपूर्वी सर्व विभागात जाऊन पाहणी केली असता तब्बल 29 कर्मचारी गैरहजर आढळून आले.या सर्व कर्मचचाऱ्याना नोटीस बजावत एक दिवसाचा पगार कपातीचा दणका देत, कार्यालयीन वेळेची शिस्त पाळा असा इशारा देण्यास त्या विसरल्या नाही.

मागच्या दोन दिवसांपासून कर्मचारी दहा वाजेच्या आत विभागातील आपआपल्या खुर्चीवर ठाण मांडून बसत आहेत.विशेष म्हणजे ग्रामीण भागातील कामाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेला येणाऱ्या अभ्यंगताची मात्र गैरसोय होणे बंद झाले आहे.असे अभ्यागत सीईओ वर्षा ठाकूर यांचे आभार मानत आहे.