कारची समोरासमोर धडक; पीएसआय जगडेसह सहा जण जखमी

क्राईम

 

नांदेड,बातमी24:- राष्ट्रीय महामार्ग 61 वरील भोकर ते बारड रोडवर दोन कारची समोरासमोर घडक झाली.या अपघातात तामसा पोलीस ठाण्याचे पीएसआय जगडे यांच्यासह सात ते आठ जण जखमी झाले आहेत.हा अपघात बुधवार दि.9 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एच.46.बीएम3135 क्रमांकाच्या कारची धडक एम. एच.12 के.वाय.1207 या दोन्ही कार या इर्टीगा कंपनीच्या गाड्या आहेत.या दोन्ही गाड्यांची धडक बारड रोडवर झाली, या अपघातात तामसा येथून तपासला जाणाऱ्या पीएसआय जगडे,पोलीस नाईक अडसुले, पोलीस जमादार कोळशिकर यांच्या समोरच्या गाडीमधील पाच ते सहा जण जखमी झाले.जखमीमधील दोन ते तीन जण गंभीर जखमी असून त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती पीएसआय दुरपडे यांनी दिली.

वरील सर्व जखमींना महामार्गचे पोनि श्री. अरुण केंद्रे, म. पो. केंद्र बारडचे प्रभारी अधिकारी श्री. विठ्ठल दूरपडे, पोना भागवत आयनीले, पोना अफसर पठाण , पोकॉ देवानंद थाडके , चापोकॉ बालाजी ठाकूर यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने बारड व नांदेडच्या दवाखान्यात तात्काळ हलविले.