कोरोना लसीकरणाच्या प्रत्यक्ष फेरीला उधापासून प्रारंभः- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात तब्बल 17 हजार 19 लसींची उपलब्धता झाली, असून दि. 16 जानेवारीपासून लसीकरणाच्या मोहिमेस प्रारंभ केला जाणार असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात लस पोहचली आहे. या लसीचे सुरक्षितरित्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या भांडार कक्षातील शीतगृहात ठेवण्यात आल्या आहेत.

पहिल्या फे रीत हेल्थ वर्कस म्हणून काम करणार्‍या जिल्ह्यातील 17 हजार 99 जणांना पहिल्या टप्यात लसीकरण केले जाणार आहे.यात 661 वैद्यकीय अधिकारी, 1 हजार 489 परिचारिका, 1 हजार 530 अशा वर्कर्स, 5 हजार 632 अंगणवाडी सेविका, 1 हजार 845 बहुउद्देशीय कर्मचारी, 2 हजार 957 फ ्रंटलाईन वर्कर, 1 हजार 323 पॅरामेडिकल, 1 हजार 302 सहाय्यक कर्मचारी,390 कार्यालयीन संबंधित कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे डॉ. इटनकर यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांची उपस्थिती होती.