नांदेड, बातमी24:-सुप्रसिद्ध गज़लकार इलाही जमादार यांना नांदेड येथे शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी नांदेडकरांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूर्णा रोडवरील नागोराव नरवाडे मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.कवीश्रेष्ठ इलाही जमादार यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
नांदेडकरांच्यावतीने या कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या गज़ल, गायन, वाचन आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणा-या मनोगतांमधून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मंत्रालयातील अवर सचिव विकास तु. कदम, गज़लकार व्यंकटेश कुलकर्णी (हैद्राबाद), गज़लकार विमल मुदाळे (लातूर), डॉ. अरुण साबळे (शिर्डी), मेगेश रुपटक्के (पुणे), अशोक डोंगरे (माजलगाव) या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अभिवादन कार्यक्रमात नांदेड शहरातील गायक, कलावंत इलाही जमादार यांच्या विविध रचना सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी कवीश्रेष्ठ इलाही जमादार स्मृती समारोह समितीचे प्रा. विकास कदम, डॉ. राजेंद्र गोणारकर, माया भद्रे, बापू दासरी सदाशिव गच्चे, अॅड. साहेबराव शेळके, राम चव्हाण, बी.के. कांबळे, रोहित शास्त्री अडकटलवार, अरुण फाजगे, दिपक नरवाडे, प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, डॉ. कैलास धुळे, पत्रकार प्रविण खंदारे, प्रा. जगदीश केंद्रे, अॅड. नागराज मांजरमकर, इंजि. सम्राट हटकर, मानव कुंडलवाडीकर, शंकर नरवाडे, मिलिंद ढवळे, बाबूराव पाटील, यशवंत कदम, लक्ष्मी लहाने, अविनाश नाईक, नामदेव इंगळे, अविनाश भुताळे, डॉ. राजेंद्र लोणे आदींनी पुढाकार घेतला आहे.