उधोग चालविण्यासाठी शासनाने सवलती द्याव्यात:-उधोजक शैलेश कऱ्हाळे

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-केंद्र व राज्य सरकारने उधोग चालविण्यासाठी जाहीर केलेल्या सवलती उपलब्ध करून घ्याव्यात,या मागणीचे निवेदन उधोजक शैलेश कऱ्हाळे व त्यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना नुकतेच दिले.

शैलेश कऱ्हाळे म्हणाले,की देशभर कोरोनात उधोग-धंद्याचे हाल झाले.दरम्यानच्या काळात उधोग मोडकलीत पडले आहेत. उधोगाना चालना देणे आवश्यक आहे.अन्यथा उधोगावर मोठा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल,यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहिर केलेले आर्थिक पॅकेज जिल्हा पातळीवरील उधोजक यांना दिले,तर व्यवसायाला गती येऊ शकेल. तसेच देशासह राज्याचे आर्थिक चक्र गतिमान होण्यास मदत होईल,त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची अमलबनवणी होणे आवश्यक असल्याचे मत शैलेश कऱ्हाळे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले.

सध्या कृष्णूर व किनवट औधोगिक वसाहतमध्ये पाण्याचे दर अधिक लावले जातात.नांदेडमधील एमआयडीसीप्रमाणे दर लागू करावे या सह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.