नांदेड, बातमी24:-जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुर्वी करण्यात आलेल्या अँटीजन चाचणीत समाजकल्याण सभापती रामराव नाईक यांच्यासह आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
वर्षेभराच्या अंतरानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा प्रत्यक्षरित्या खुल्यात सभागृहात सुरू आहे. सभागृहात सदस्य,अधिकारी व सभापती यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले.त्यानुसार करण्यात आलेल्या चाचणीमध्ये चाचणी सभापती रामराव नाईक, सद्स्य महिला पूनम पवार,अंकिता मोरे,संतोष राठोड, महिला सदस्य बोनलेवाड, सावतकर यांच्या कार्यकारी अभियंता रायभोग,देगलूर बीडीओ मुक्कावार आदींचा समावेश आहे.
अँटीजन चाचणीवरून काही सदस्यांनी आक्षेप नोंदविला, चार दिवसांपूर्वी चाचणी का घेण्यात आली,यावरून पूनम पवार यांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला,परंतु नियमांचे काटेकोरपणे आंबजावणी करण्याची हात जोडून विनंती केल्यानंतर पूनम पवार यांनी सभागृह सोडले.