आमदार कल्याणकर यांचे नगरसेवक पद रद्द;दिवाणी न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्र

 

नांदेड,बातमी24:- नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचे नगरसेवकपद नांदेडच्या दिवाणी वरिष्ठ न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय शनिवार दि.6 रोजी दिला.त्यामुळे त्यांच्या जागी त्याचे प्रतिस्पर्धी राहीलेल्या दिनेश मोरताळे यांना विजयी घोषित केले.

नांदेड-वाघाला महानगरपालिकेची सन 2017 साली सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्या निवडणूकीत वॉर्ड क्रमांक (ड) मधून शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार दिनेश मोरताळे यांच्यात निवडणूक झाली.त्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एक मताने कल्याणकर यांना विजयी घोषित केले होते.

या निर्णयाविरुद्धात मोरताळे यांनी नांदेडच्या दिवाणी न्यायालयात निवडणूक निकालाच्या सात दिवसात आक्षेप याचिका दाखल केली होती.यावर शनिवारी सुनावणी झाली,असता मतमोजणीच्या एकाच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन निकाल दिले.यात पहिल्या निर्णयात 157 मतांनी कल्याणकर विजयी झाल्याचे घोषित केले.यावर मोरताळे यांनी आक्षेप घेत फेरमतमोजनी करण्याची मागणी केली.फेरमतमोजणीत कल्याणकर हे दोन मतांनी विजयी झाल्याचे पुन्हा घोषित केले.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीत फेरफार केला.पोस्टल मतदानाकडे दुर्लक्ष केले,असून दिनेश मोरताळे यांच्या नावे मिळालेले पोस्टल मतदान लपविल्याचा आरोप केला.त्यावेळी 119 पोस्टल मतदान झाले होते.यातील 19 मते गायब झाल्याचे मोरताळे यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची सुनावणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लागली,असता पोस्टल मतदानात फेरमोजनी झाली. असता मोरताळे यांचे एक मतदान वाढले.हा सगळा प्रकार म्हणजे निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया दोषपूर्ण असल्याचे न्यायालयास आढळून आले.

यासंबंधी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांनी या प्रकरणी निकाल देताना बालाजी कल्याणकर यांच्या बाजूने लागलेला निकाल रद्द ठरवीत दिनेश मोरताळे यांना नगरसेवक म्हणून घोषित केले.

दिनेश मोरताळे यांच्या बाजूने ऍड.व्यकटेश पाटनुरकर यांनी बाजू मांडली.बालाजी कल्याणकर यांच्या बाजूने ऍड.व्ही.एन.देशमुख यांनी तर निवडणूक अधिकारी यांच्याकडून बी.आर.भोसले यांनी काम पाहिले.