नांदेड, बातमी24:जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत देगलूर येथे उपअभियंता पदावर कार्यरत असलेल्या आणि मधल्या काळात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त कारभारी असताना वादग्रस्त कारभारामुळे बदनाम झालेले आर.एस.बारगळ यांना पुन्हा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून अतिरक्त कारभार देण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. वर्ग दोनच्या अधिकाऱ्यासाठी वर्ग एक च्या अधिकाऱ्यास शासनाने हटविण्याचा अजब प्रकार पहिल्यांदाच बहुदा घडला असावा.
शासनाने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे,की सध्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा अतिरिक्त असलेला पदभार जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.बाविस्कर यांच्याकडे असून, सदरील पदभार श्री.बारगळ यांच्याकडे सोपविण्यात यावा. असे आदेश शासनाच्या पाणी पुरवठा व स्वछता विभागाने काढले आहेत.
यापूर्वी श्री.बारगळ यांच्याकडे काही महिने पाणी पुरवठा विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा पदभार असताना जिल्ह्यातील आमदार मंडळी,जिल्हा परिषद सदस्य यांना एकेरी भाषा वापर करणे, कामात अनियमितता करणे,वरिष्टाच्या आदेशाचे पालन न करणे,असे प्रकार घडलेले,असून भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.
शासनाने सुद्धा त्याच्या कार्यपद्धतीवर त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती.तसेच जिल्हा परिषदेमधून सुद्धा त्यांच्या कार्य पद्धतीवर मोठा असंतोष उफाळून आला होता,शिवाय
अतिरिक्त पदभराची लालसा बाळगून असलेले बारगळ हे पुन्हा नांदेड जिल्हा परिषदमध्ये शासना मार्फत एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा पद्धतीने बारगळ यांचे जिल्हा परिषदेत येणे अधिकारी,पदाधिकारी व जिल्हा सदस्य व गुत्तेदार आदींना अजिबात रुचणारे ठरणार नाही. असे असताना जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अबुलगेकर व जि. प. सीईओ वर्षा ठाकूर यांना रुजू करून घेतील,का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.