नांदेड,बातमी24
जिल्ह्यातील सर्व शाळा दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज दिली.
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांच्याशी शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज चर्चा केली.
कोविड विषाणूंच्या संसर्गात झपाट्याने वाढ होत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांनी मिशन बिगीन अंतर्गत शाळा बंद करण्यात येत असल्याचे परिपत्रक आज दि.15 मार्च रोजी जारी केले आहे.
शाळा स्तरावर ज्या परीक्षा चालू आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात,विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी कोरोना संदर्भात जनजागृती करून नागरिकांमध्ये कुठल्या पद्धतीची घबराट पसरणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपापल्या परिसरात ,घरात वावरताना कोविडच्या संदर्भाने सर्व काळजी घ्यावी.काही लक्षणे आढऴल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.