नांदेड, बातमी24ः– राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील उमरी तालुक्यातील वाघलवाडा येथील साखर कारखान्याचा विक्री लिलाव झाला होता. या लिलालावा सर्वाधिक बोली लावून जिल्हा परिषदेची माजी सदस्य असलेल्या मारोतराव कवळे यांच्या एमव्हीके उद्योग समुहाने खरेदी केला आहे. कवळे यांनी कारखाना खरेदी करून नायगाव मतदारसंघातील बदलाचे संकेत दर्शविले आहेत.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अंतर्गत असलेल्या कुसुमनगर वाघलवाडा येथील साखर कारखाना विक्रीस काढण्यात आला होता. दि. 24 जून रोजी अंतिम लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये तीन वेगवेगळया कंपन्याची निविदा आली होती. यात मारोतराव कवळे गुरुजी यांच्या एमव्हीके उद्योग समुहाने सर्वाधिक बोली लावून 51 कोटी 21 लाख रुपयांची लावली होती. त्यामुळे लिलावाच्या रितसर नियमांप्रमाणे विक्री झाला.
बापुसाहेब गोरठेकर यांचे कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मारोत कवळे गुरुजी मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. गोरठेकर हे भाजपातत गेले आणि इकडे कवळे यांनी यावेळची विधानसभेची निवडणूक नायगाव विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढविली. सहकार क्षेत्रात बँकीगचे झाळे विणल्यानंतर दुग्ध सहकारी संस्था व नंतर गुळ उत्पादनाकडे वळलेले मारोतराव कवळे हे साखर कारखान्याकडे वाटचाल सुरु केली आहे.
बापुसाहेब गोरठेकर हे भाजपमध्ये गेल्याने कवळे यांनी अशोक चव्हाण यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहे. कारखाना चालविण्याचे आव्हान असले, तरी कवळे गुरुजी यांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास व चिकाटी असल्याने ते कारखाना चालविण्याचे आव्हान सहजपणे पैलतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.
——
हा कारखाना पुढील काळात शेतकर्यांचा कामधेनू असेल, यात माझ्या मनात शंका नसून उस उत्पादक शेतकर्यांच्या जिवनामध्ये परिवर्तन आणण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.
मारोतराव कवळे (उद्योजक)