प्राणवायूची आवश्यकता नसणाऱ्या रुग्णांनी घरीच उपचार घ्यावे:-सी. एस.डॉ.भोसीकर

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली,असून आज घडीला सहा हजाराहून अधिक रुग्ण हे बाधित आहेत.ज्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे, अशाच रुग्णांनी शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले.

मागच्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असून हा आकडा हजाराच्या पुढे सरकला आहे. स्वतःसह आपल्या कुटूंबियांना कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवायचे असेल,तर मास्क लावणे, सतत हात धुणे व गर्दी टाळणे असे प्रसंग टाळणे गरजेचे असल्याचे डॉ.भोसीकर म्हणाले.

संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे.खबरदरीची उपाय योजना म्हणून पुढील काळात लॉकडाउनचे नियम सर्वांना पाळावे लागतील, जेणेकरून संसर्गाचा अटकाव बसेल,तसेच ज्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासणार नाही,अशा रुग्णांनी घरीच विलगीकरण करून घ्यावे, नाना नानी पार्क येथील कोरोना किट घेऊन औषधोपचार घेतल्यास रुग्ण बरा, नक्की होतो,मात्र प्राणवायूची गरज भासल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात भरती व्हावे,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले.