पालकमंत्री चव्हाण यांच्या स्वागताला गर्दी

देश

नांदेड, बातमी24ः- राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पहिल्यांदाच ते नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले. मागच्या वेळी कोरोनामुळे खासगी विमान नाकारण्यात आले होते. मात्र या वेळी सहकुटुंब ते विमानाने नांदेडला आले. या वेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती.

मागच्या महिन्यात 22 मे रोजी अशोक चव्हाण यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. ते पुढील उपचारासाठी मुंबई येथे गेले होते. कोरोनावर मात केल्यानंतर पुढील काही दिवस मुंबई येथील निवासस्थानी होम क्वॉरंटाईन झाले होते. त्यानंतर ते मुंबईमधील मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही हजर राहिले.

अशोक चव्हाण हे मात्र 32 दिवसानंतर शुक्रवार दि. 26 जून रोजी एक वाजेच्या सुमारास सहकुटुंब खासगी विमानाने नांदेड येथे आले. या वेळी स्वागताला महापौर सौ. दीक्षा धबाले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विधान परिषद आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, जिल्हा परिषद सभापती संजय बेळगे, मनपा आयुक्त डॉ. लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, दिलीप स्वामी, जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब रावणगावकर, सभापती अ‍ॅड. रामराव नाईक, विरेंद्रसिंह गाडीवाले, आनंद चव्हाण, विजय येवनकर, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.