नांदेड,बातमी24 :- नाशिक येथे ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी शासकीय कोविड केअर सेंटर, रुग्णालयाच्या सुरक्षिततेसंबंधी आढावा घेऊन सर्व संबंधित विभाग प्रमुखांना योग्य ती दक्षता घेण्याचे त्यांनी निर्देश दिले.
जिल्हा रुग्णालयाच्या जागेत असलेल्या ऑक्सीजन टँकची त्यांनी स्वतः पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे व इतर अधिकारी होते.
जिल्हा रुग्णालय येथील कोविड बाधित पेशंटची संख्या व ऑक्सिजनची निकड लक्षात घेऊन या ठिकाणी नव्याने वीस टन क्षमतेच्या आॕक्सीजन टॅंक उभारणीच्या कामाचा आढावा घेतला.