साडे बाराशे रुग्णांची कोरोनावर मात

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून सोमवार दि.26 एप्रिल रोजी 873 नवे बाधित आढळले तर 24 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

गत 24 तासात 3 हजार 564 चाचण्या करण्यात आल्या. यात 873 जण बाधित आले.मनपा हद्दीत 337 तर ग्रामीण भागात 512 जणांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित संख्या 76 हजार 928 झाली.यातून कोरोनावर मात केलेल्याची संख्या 62 हजार 418 एवढी असून सध्या 12 हजार 795 जणांवर उपचार सुरू आहेत.
———–
24 जणांचा मृत्यू मागच्या तीन दिवसात 24 जणांचा मृत्यू झाला. यात सहा महिला व 18 पुरुष समावेश आहे.