जळीत मृत्यू प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्यसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

क्राईम

नांदेड,बातमी24: लोहा तालुक्यातील चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शिवदास संभाजी ढवळे वय 52 यांनी वन विभागातील झालेल्या बंधाऱ्यांच्या बोगस कामाची चौकशी केली जावी ,हरीण व मोरांच्या हत्येची चौकशी व्हावी यासह इतर मागण्यांच्या संदर्भात दिनांक 28 रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिनांक 16 मार्च रोजी दिले होते.त्याच जागेवर सकाळी जळालेल्या आवस्थेत त्यांचा मृत्यू आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.याप्रकरणी मयत मुलाच्या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद सदस्य व इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वन विभागाच्या जागेत दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता जळालेल्या आवस्थेत मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिस स्टेशन येथे कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून शिवदास ढवळे यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

चोंडी परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर मागील काही वर्षांपूर्वी मनरेगा तुन मातीनाला बांधकाम करण्यात आले होते यावेळी चार हरीण व 10 मोरांची हत्या झाली होती ,या संदर्भाने सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींना पाठीशी घालत कार्यवाही केली नाही असे सांगत शिवदास ढवळे यांनी वेळोवेळी निवेदन देत कार्यवाही करण्याची विनंती केली. शेवटी त्यांनी आत्मदहनाचा इशारा 28 एप्रिल रोजी दिला.

यावेळी माळाकोळी पोलिस ठाणे येथे मुलगा जनार्दन शिवदास ढवळे यांच्या फिर्यादीवरून माजी जि प सदस्य देविदास गीते व अन्य पाच आरोपींविरुद्ध कलम 306/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, माळाकोळी पोलीस स्टेशन येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक भागवत जायभये यांनी भेट देऊन नातेवाईकांशी चर्चा केली व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गतीने करत आरोपींना अटक करण्यासाठी तीन पथके रवाना केली.पुढील तपास माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.