हवामान बदलामुळे प्रदेशाध्यक्षासह चार मंत्र्यांचा मुक्काम वाढला

महाराष्ट्र

नांदेड,बातमी24:- काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या अंत्यविधीसाठी राज्यभरातील काँग्रेसचे दिगग्ज नेते नांदेड मार्गे कळमनुरी येथे हजर राहिले.मात्र हवामान बदल व मुंबई विमानतळावर पाणी साचल्याने काँग्रेसच्या नेत्यांसह मंत्र्यांचा नांदेड दौरा वाढला आहे.

राजीव सातव यांचे पुणे येथे रविवारी पहाटे निधन झाले.सोमवारी सकाळी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार झाले. या अंत्यविधीसाठी राज्यभरातील काँग्रेस नेते व मंत्रीगण नांदेड येथे रविवारी रात्री आठ वाजता मुक्कामी आले होते.

मंत्री व नेतेमंडळी अंत्यविधी कार्यक्रम आटोपून नांदेड येथे आले,दुपार जेवण करून हे सर्व नेते मुंबईकडे रवाना होणार होते,यासाठी सायंकाळीसाडे पाच वाजेची वेळ ठरली होती.
मात्र महाराष्ट्रच्या दिशेने येत असलेल्या तौक्ते चक्री वादळाने रविवारी रौद्ररुप धारण केल्याने मुंबईची हवाई वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,ऊर्जामंत्री नितीन राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी यांचा मुक्काम वाढला,असून मंगळवारी सकाळी सात वाजता विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

राज्यमंत्री विश्वजीत कदम अंत्यसंस्कारानंतर पुण्याकडे तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हे सोमवारी दुपारी हुबळीकडे रवाना झाले.