पर्यावरण संवर्धनाची कृतिशिलता जपत नगरसेवक गजभारे यांचा वाढदिवस

नांदेड

 

नांदेड, बातमी24:-राजकीय जीवनात वावरणारे नांदेड मनपाचे नगरसेवक बापूराव गजभारे हे कायम सामाजिक जाणिवेतून काम करणारे नेतृत्व अशी ओळख सर्वत्र आहे. पाच जून रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमिताने प्रभागात जागोजागी वृक्षारोपण करत कृतिशील रित्या वाढदिवस साजरा केला.

बापूराव गजभारे हे सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सदैव सक्रिय असणारे राजकारणी म्हणून सुपरिचित आहेत. जागतिक पर्यावरण दिन व त्यांचा वाढदिवस हा योगायोग असतो. वाढदिवसाच्यानिमीत्ताने विधायक कार्य ते पार पाडत असतात.गत वर्षी ताळेबंदीच्या काळात गोरगरीब जनतेस अन्नधान्य तसेच अन्नदान असा कार्यक्रम बरेच दिवस राबविला.

यावेळी प्रभाग 10 मध्ये वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.यावेळी माजी मंत्री डी. पी.सावंत,महापौर मोहिनी येवनकर,स्थायी समिती सभापती वीरेंद्र गाडीवाले,मनपा आयुक्त डॉ. संजय लहाने,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विठ्ठल पाटील डक,नगरसेवक दयानंद वाघमारे,विनोद भरणे,जी नागय्या,सतीश बनसोडे,कुलदीप चिकाटे आदींच्या उपस्थिती वृक्षारोपण करण्यात आले.