पंचायत राज जम्बो समितीचे आव्हान पेलण्यासाठी जिल्हा परिषदेची कसून तयारी

नांदेड

 

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:-पाच वर्षांनंतर पंचायत राज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.2 सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस असणार आहे. 31 सदस्य संख्या असणाऱ्या या समितीच्या प्रत्येक प्रश्नांला लेखी उत्तर देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद विभागावर कसून सराव करून घेतल्याचं समजत.

पंचायत राज समिती नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगस्टमध्ये येणार होती.मात्र तयारीसाठी जिल्हा परिषदेला पुरेसा वेळ मिळणार नसल्याने मुदतवाढ देण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली होती.या विनंतीचा मान राखत समिती दि.2,3 व 4 रोजी येत असून पहिल्या दिवशी ही समिती सन 2016-17 मधील लेखा परीक्षण पुनर्विलोखन अहवालबाबत कागदोपत्री माहिती घेणार आहे.त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचायत समिती दौरे व तिसऱ्या दिवशी वार्षिक प्रशासन अहवाल 2017-18 यावर समिती माहिती घेणार आहे.

प्रशासनाने प्रत्येक विभागवार आढाव बैठका घेऊन अहवाल तयार केला असून समितीकडे बुकलेटही पाठविले आहे.कुठेही कुठल्याही प्रकारची उणीव राहता कामा नये,याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी मैरेथॉन बैठका घेऊन जोरदार तयारी चालविली आहे.मात्र समिती सहजपणे जिल्हा पर्यटन करून जाईल असे वाटत नाही.त्यामुळे प्रशासनाने ताक फुकुन पिण्याची तयारी चालविली आहे.
——-
इंनकॅमेरा आढावा
पंचायत राज समिती तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असली,तरी या समितीला इन कॅमेरा म्हणजे दृक्श्राव्य यंत्रणेसमोर अधिकाऱ्यांना बोलावे लागणार आहे. त्यामुळे समिती सदस्यांना सुद्धा अहवाल घेताना अपशब्द कुणालाही वापरता येणार नाही.
—–
समितीसाठी तयारी पूर्ण
पंचायत राज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या समितीच्या नियोजनासाठी सात समित्या जिल्हा परिषदकडून बनविण्यात आल्या आहेत.यामध्ये कोविड-19 च्या नियमांचे पालन केले जाणार असल्याचे समजते.याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही.