पीआरसी’च्या निमित्ताने सीईओ ठाकूर यांची लीडरशिप ठरली लय भारी

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:-पंचायत राज समितीचा नुकताच तीन दिवशीय दौरा झाला. या विधिमंडळ समिती संदर्भातील करण्यात आलेले उत्कृष्ट नियोजन आणि अद्यावत अहवाल सादरीकरण या बाबी समितीच्या दृष्टीने प्रभावी ठरल्या.याबाबत समिती अध्यक्ष असो अथवा समिती सदस्य या सर्वांनी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कार्याची प्रशंसा केली.त्यामुळे पीआरसीच्या निमित्ताने सीईओ वर्षा ठाकूर यांची लीडरशिप भारी ठरली असून जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी यांना सीईओ ठाकूर यांच्याकडून नेतृत्व गुण शिकण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे.

पाच वर्षानंतर पंचायत राज समितीने नांदेड जिल्हा परिषद दौरा केला. या समिती पहिल्या दिवशी लेखा परीक्षण व पुनर्विलोकन अहवाल दुसऱ्या दिवशी पंचायत समिती दौरे तर तिसऱ्या दिवशी सन 2017-18 वार्षिक प्रशासन अहवालावर सीईओ यांची साक्ष असा कार्यक्रम होता.

या समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमूलकर यांच्यासह विधान परिषद व विधान परिषद असे मिळून 22 आमदार मंडळी दौऱ्यावर आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील भव्य अशा इमारतीमध्ये हा तीन दिवसांचे प्रशासकीय कामकाज चालले.या आमदार मंडळींच्या नियोजनात कुठल्याही प्रकारची उणीव भासू दिली नाही. नियोजन भवनातील भव्यता आमदार मंडळीचे हृदय स्वागत करणारी ठरली.ज्या प्रकारे समितीसाठी उत्कृष्ट नियोजन केले गेले होते, अगदी तशीच अहवाल सादरीकरण बाबत कटाक्ष पळाला गेला. तसेच  अहवाल वाचनातील प्रत्येक बाबींचा बारकाईने अभ्यास सीईओ ठाकूर यांनी केला होता.त्यामुळे पीआरसी ने अनावश्यक तानातानी करता आली नाही. यातील विशेष बाब म्हणजे, समितीला फारशा गंभीर बाबी किंवा चुका हाती लागल्या नाही.त्यामुळे कुणावर ही कारवाई झालेली नाही.याचे श्रेय सीईओ ठाकूर यांच्या कार्यपद्धतीला जाते.

समितीच्या प्रत्येक विभागातील प्रत्येक मुद्यावर जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख म्हणून सीईओ वर्षा ठाकूर या उत्तरे देत होत्या. होत्या.मोजक्या दिवसांमध्ये विभागवार तयारी करून घेणे,दुसरीकडे समिती दौर्याबाबत कुठेही अनियमितता राहता कामा नये,याची विशेष दक्षता घेणे,यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करून वेळोवेळो आढावा घेणे, हे तारेवरच्या कसरतीसारखे होत.हे सगळी लिडरशिप एक अधिकारी महिला करत होती, हे विशेष कौतुकास्पद म्हणावे लागेल. पीआरशीच्या सीईओ ठाकूर यांच्यातील अष्टपैलूपणा हा त्यांच्यातील नेतृत्व गुणांची झलक दाखवून देणारा ठरला.

या दौऱ्याच्या निमित्ताने समिती अध्यक्ष असो अथवा समिती सदस्य आदींनी जिल्हा परिषद कडून करण्यात आलेल्या नियोजन आणि सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सीईओ वर्षां ठाकूर यांच्याबद्दल आपण एक अभ्यासु,लोकांमध्ये सहभागी होणाऱ्या अधिकारी असल्याचा अभिप्राय समिती प्रमुखांनी नोंदविल्याचे समजत. समिती अध्यक्ष यांच्याकडून प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याबद्दल अशा प्रकारे मत नोंदविणे म्हणजे प्रशासनाचा बहुमान उंचावला असे म्हणावे लागेल. त्यामुळे पंचायत राज समिती दौऱ्याच्या निमित्ताने सीईओ ठाकूर यांच्यातील प्रशासकीय नेतृत्व क्षमता यावर शिक्कामोर्तब झाले. सीईओ म्हणून नऊ महिन्यांपूर्वी आलेल्या ठाकूर यांनी ग्रामीण भागाशी आपली जवळीकता निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील जनता,पदाधिकारी-अधिकारी व कर्मचारी समनव्य उत्तम प्रकारे राखत यातून स्वतःची प्रभावी छबी निर्माण केली.हे त्यांच्यातील कौशल्य जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी सुद्धा सीईओ ठाकूर यांच्याकडून नेतृत्व गुणांचे धडे गिरवायला हवे असेच आहे.