जातीवादी हल्ल्यातील आरोपींना कडक शासन करा- सुखदेव चिखलीकर

नांदेड

नांदेड, बातमी24ः- हिंगोली जिल्ह्यातील सोमठाणा व सावरखेडा येथील दलितवस्तीवर करण्यात आलेल्या जातीयवादी हल्ला प्रकरणी दोषी आरोपींना कडक शासन करण्यात यावे, या मागणीचे निवेदन बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले, की हिंगोली जिल्ह्यातील सावखेड येथील दलितवस्तीवर गावातील जातीवादी गुंडांनी हल्ला चढवित येथील बांधवांना गंभीर जखमी केले. या घटनेची शाई वळते न वळते याच जिल्ह्यात सारवखेड येथील वस्तीवर सुद्धा अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला. जातीवादी गुंडांना पोलिसांची भिती वाटत नसल्याने अशा प्रकारचे हल्ले वाढत असल्याचे सुखदेख चिखलीकर यांनी प्रशासनाच्या निर्देशनास आणून दिले.

या दोन्ही गावात हल्ला करणार्‍या जातीवादी गुंडांविरुद्ध कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणाती योग्य तरी कारवाई करण्याच्या आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे चिखलीकर यांनी सांगितले.या वेळी राजेश चौदंते, शिलराज कोल्हे, राहुल इंगोले, नितीन देडे, किरण चित्ते आदींची उपस्थिती होती.