नांदेड, बातमी24:- चार दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व शाळा दि.11 पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज शाळा सुरू हो झाल्या; पंरतु शाळाच निर्णय अंमलात आणत दोन्ही शिक्षण विभागाने सुधारित आदेश काढत जिल्ह्यातील सर्व शाळा दि. 22 पासून सुरू होणार आहेत. या निर्णयास शिक्षण समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी विरोध दर्शविला.
मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या शाळा दिवाळी सुट्यामुळे बंद होत्या.या शाळा 11 पासून सुरू करण्याचा निंर्णय शिक्षण समिती बैठकीत शिक्षण सभापती संजय बेलगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला होता.त्यानुसार आज शाळा सुरू ही झाल्या. मात्र दिवाळी सुट्या खूप कमी मिळत असल्याने काही शिक्षक संघटनांनी शाळा 22 पासून सुरू कराव्यात अशी मागणी केली.तसेच राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा 22 पासून सुरू होतील असे निर्णय जाहीर केला.
त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुद्धा 22 पासून सुरू होणार आहेत. हा निर्णय म्हणजे शिक्षण समितीचा ठराव म्हणजे केराची टोपली असल्याची प्रतिक्रिया साहेबराव धनगे यांनी व्यक्त केली.