मुंबई,बातमी:- अनिरुद्ध वनकर हे ध्येयाने झपाटलेल्या माणूस आहे,चळवळीशी आणि आपल्या नाट्य,गायनाशी जोडलेला अष्टपैलू कलावंत अनिरुद्ध वनकर यांच्यामध्ये बघायला मिळतो, मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांना मी जवळून पाहतोय व त्यांची गाणी ऐकतोय,त्यामुळे अनिरुद्ध वनकर यांच्या कला,नाट्य व गायन क्षेत्रातील हिरो आणि हिरा माणूस बघायला मिळतो,असे उद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काढले,निमित्त होते अनिरुद्ध वनकर यांनी लिहलेल्या घायाळ पाखरा व समशान पटेल आहे, या नाटकाच्या पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी ते बोलते होते,
यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत, तर विशेष अतिथी म्हणून डॉ.प्रदीप आगलावे,काकासाहेब खनबालकर,रिपाई नेते बापूराव गजभारे,मंगेश बनसोड,किशोर भवरे आदींची उपस्थिती होती.
अशोक चव्हाण म्हणाले,की अनिरुद्ध वनकर हे झपाटलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.कलावंतांना राज्यपाल कोट्यातून संधी दिली पाहिजे, ही आमची पहिल्यापासून भूमिका होती,ती भूमिका घेऊन वनकर यांचे नाव पुढे केले.आज खऱ्या अर्थाने राज्यपाल यांना या कार्यक्रमास बोलविले पाहिजे होते,किमान त्यांना आजचा कार्यक्रम पाहून कलावंत कसे असतात हे समजू शकले असते, अशी कोपरखळी अशोक चव्हाण यांनी राज्यपाल यांना लगावली.
आजघडीला देश वेगळ्या वळणार केंद्र सरकार आणू पाहत आहे, स्वतंत्र लढा लढला गेला,ती एक चळवळ होती,अलीकडच्या काळात जे वक्तव्य बाहेर येत आहेत,हे ऐकून कीव येत आहे,इतिहास बदलण्याची भाषा चिंतनाची बाब आहे.त्यामुळे सर्व क्षेत्रातील विचारवंत व कलावंत मंडळींशी आवाज उठविला पाहिजे,अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले,की देशात जे वातावरण केंद्र सरकार आणू पाहत आहे, यास वेळीच जोखीम म्हणून मुकाबला करणे गजरचे आहे, देशाच्या इतिहासाला आव्हान निर्माण करणाऱ्या वृत्ती रोखाव्या लागतील,यासाठी आपल्या सर्वांना पुढे यावे लागेल,यात कलावंत यांचे स्थान महत्वाचे राहणार असल्याचे सांगत थोरात म्हणाले,की अनिरुद्ध वनकर यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषद सदस्य पदासाठी केलेली शिफारस रास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.नितीन राऊत यांनी अनिरुद्ध वनकर यांच्या पुस्तकास शुभेच्छा देत,आम्ही दोघे एकाच विद्यापीठ येथून शिकून पुढे आलो आहेत,आमचं दोघंच ध्येय हे धर्मांध शक्तीला रोखणे हे आहे, चांगला नावारुपाला आलेला कलांवत अशी त्यांची ओळख आहे,हे कार्य ते पुढे नेटाने घेऊन जातील अशा आशावाद डॉ.राऊत यांनी व्यक्त केला.
बापूराव गजभारे म्हणाले,की अनिरुद्ध वनकर यांना कलाकार म्हणून पुढे आणण्याचे काम नांदेड आणि मराठवाडयाने केले.त्यांच्या गायकीला मराठवाड्याने डोक्यावर घेत मोठं मान आणि स्थान दिल.अशा कलावंत व्यक्तीस आमदारकीसाठी ही मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण यांची शिफारस महत्वाची ठरली असल्याचे बापूराव गजभारे यांनी आवर्जून सांगितले.