कालच्या तुलनेत दुप्पट बाधितांची नोंद; तिसऱ्या लाटेचा जोरदार मुसंडी

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक सर्वत्र वेगाने पसरत आहे. याचा परिणाम नांदेड जिल्ह्यातही दिसायला सुरुवात झाली असून कालच्या तुलनेत आज कोरोनाने बाधित झालेल्या नागरिकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले.

नांदेड जिल्ह्यात मागच्या आठ दिवसामध्ये रुग्ण संख्या वाढू लागली आहे.गुरुवार दि.6 रोजी 34 कोरोनाचे संसर्ग बाधित आढळून आले होते.तर शुक्रवार दि.7 रोजी रुग्णसंख्या 74 झाली आहे.यांच्यामध्ये 998 अहवाल तपासण्यात आले.

मनपा हद्दीत 46,नांदेड ग्रामीण-10,माहूर-1,मुदखेड-३,अर्धापुर-2,धर्माबाद-1 तसेच हिंगोली, पुसद,मुंबई,मनींपुर येथील बाधितांची नोंद आहे.यात विष्णुपुरी येथील वैधकीय रुग्णालयात 15,गृहविलगिकरण 27,खासगी रुग्णालय -8,जिल्हा रुग्णालयात-2 तसेच मनपा हद्दीत गृह विलगिकरणमध्ये 159 जणांचा समावेश आहे.