नांदेड जिल्ह्यात पॉझिटिव्ह बाधितांचा स्फोट;दिवसभरात पावणे पाचशे

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या संसर्गाने बाधित झालेल्या संख्या 474 आली आहे.तिसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधित संख्या नोंदविली गेली आहे.मात्र इतक्या संख्येत अतिगभीर रुग्ण संख्या 4 इतकीच आहे.तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 17 अहवालापैकी 474 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 435 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 789 एवढी झाली असून यातील 88 हजार 26 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 108 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 328, नांदेड ग्रामीण 23, अर्धापूर 5, देगलूर 9, हदगाव 1, हिमायतनगर 1, कंधार 14, किनवट 1, लोहा 17, मुदखेड 2, मुखेड 11, नायगाव 1, उमरी 1,  परभणी 5, अकोला 2, अहमदनगर 1,हिंगोली 7, पुणे 1, अमरावती 1, वाशीम 1,  पंजाब 2, उत्तराखंड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, बिलोली 6, देगलूर 1, हदगाव 4, किनवट 3, मुदखेड 4, मुखेड 1, नायगाव 1, लातूर 1 असे  एकुण 474 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 29, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज 1 हजार 108 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 205, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 853,  खाजगी रुग्णालय 10 अशा एकुण 1 हजार 108 व्यक्ती उपचार घेत आहेत.