नांदेड,बातमी24:-राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड जिल्ह्यात ही बाधीत संख्या चारशे पार गेली असून प्रशासनाने नियम कडक केले आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या चार कोचिंग क्लासेसवर 95 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई मनपा उपायुक्त अजितपालसिंग संधू यांच्या पथकाने केली.
मागच्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या शहरात वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी नवीन नियमावली केली असून कडक नियम लागू केले आहेत.तरी या नियमाकडे दुर्लक्ष करून कोंबड्याच्या खुराडा भरल्यासारखे विध्यार्थी भरून नियमांचे उल्लंघन करू पाहणाऱ्या शहरातील चार क्लासेसला चांगलाच दणका मनपा प्रशासनाने दिला.
यामध्ये आरआरसी कलासेसला 50 हजार,शाभवी कलासेसला 25 हजार,दरक कलासेसला 10 हजार,सलघरे कलासेसला 10 हजार असा 95 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई मनपा आयुक्य डॉ.सुनील लहाने,अतिरिक्त आयुक्त बाळासाहेब मनोहरे,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंग संधू,क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव,डॉ. मिरझा बेग,रमेश चवरे,रावण सोनसले,अविनाश अटकोरे,सहा.आयुक्त सुधीर इंगोले यांच्या पथकाने केली.
कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनावर कडक कारवाई केली जाईल,कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन अजितपालसिंग संधू यांनी केले.