प्रजासत्ताक दिनी ग्रामीण भागातील जनतेला उद्देशून सीईओ ठाकूर साधणार अकरा हजार कर्मचाऱ्यांशी संवाद

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- ग्रामीण विकासाची कामधेनू असलेली जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असते.ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्र आलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था माध्यमातून ग्रामीण भागाचा भौतिक व वैयक्तिक विकास साधला जातो. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला उद्देशून घर-घर तक प्रशासन या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या जिल्हा परिषदेच्या अकरा हजार कर्मचाऱ्यांशी यु ट्युब चॅनलच्या माध्यमातून व्यापक संवाद साधणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या कल्याणार्थ विविध कल्याणकारी योजना वेगवेगळ्या विभागा मार्फत राबविल्या जात असतात. त्याचसोबत ग्रामीण भागातील रस्ते,पाणी,शिक्षण, हगणदरीमुक्त गावे, घरकुल आवास,महिला सबलीकरणासाठी बचतगट, दिव्यांग कल्याण, अशा किती तरी योजना ह्या ग्रामीण भागाचा चेहरा बदलण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात.सर्व कामे आणि विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा महत्वाची भूमिका पार पाडत असते.यासाठी जिल्हा परिषद विभाग प्रमुखापासून ते ग्रामीण भागाचा प्रमुख म्हणून ग्रामसेवक अशी यंत्रणा कार्यरत असते.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ वर्षा ठाकूर या ग्रामीण भागाशी नाळ जोडून आहेत. त्यामुळे सीईओ ठाकूर यांनी नांदेड जिल्ह्यातील 34 लाख ग्रामीण भागातील नागरिकांना उद्देशून त्या आजादी का अमृत महोत्सव अंर्तगत जिल्हा परिषदेच्या अकरा हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची निर्णय घेतला आहे. या संवाद अभियानाच्या माध्यमातून त्या अधिकारी-कर्मचारी यांना ग्रामीण भागातील लोकांशी अधिक एकरूप होऊन त्यांचे प्रश्न मार्गी लागावे,याबाबत मार्गदर्शन त्या करण्याची शक्यता आहे, यासाठी प्रशासनाने DIET NANDED या यु ट्यूब चॅनलवर लाईव्ह येणार असून या यु ट्युब ची लिंक सुद्धा देण्यात असून ती खालीलप्रमाणे आहे.https://youth.be/rF4AhP2M3Q अशी असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.