नांदेड, बातमी24:- प्रशासक काळात पदाधिकाऱ्यांकडे स्वीय सहाय्यक राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जबाबदारीने आहे,तिथे राहून प्रशासकीय काम करण्याचे आदेश दिले.सीईओ ठाकूर यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रशासक काळात पदाधिकारी यांच्याकडे काम करणारे कर्मचारी मुख्यालयी राहणार की,त्यांचा मूळ पदस्थापना ठिकाणी जाणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या विषयी मंगळवारी दुपारी सीईओ वर्षा ठाकूर यांनी त्या कर्मचारी यांची बैठक बोलाविली होती.या बैठकीस ठाकूर या ऑनलाइनद्वारे उपस्थिती होत्या. यावेळी प्रत्यक्षरीत्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोबरे यांची उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीला सीईओ वर्षा ठाकूर यांनी सर्व कर्मचारी आपण पुन्हा माहेरी आलात,असे म्हणत आपल्या सर्वांना कुठेही न पाठविता आहे, त्या ठिकाणी तूर्त काम करा,आपणास लवकरच कामाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. मात्र दिलेली कामे नेटाने करावे, लागतील अशा सूचना देत, सर्वांना आधार देण्याचा प्रयत्न सीईओ ठाकूर यांनी करत,प्रशासन अधिक मजबूत करण्यावर भर दिल्याचे बोलले जात आहे.