प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर गोळीबार;प्रकृती गंभीर

क्राईम

नांदेड,विशेष वृत्त:- नांदेड शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर गोळीबार झाला,असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.त्यांच्यावर शहरातील ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

आनंद नगर जवळील नाईक नगर येथिल त्यांच्या घराच्या गेटजवळ दोन अज्ञात इसमानी बियाणी यांच्यावर गोळीबार केला.यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी अकरा वाजता सुमारास घडली.या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी नांदेड शहरात गोळीबार,गॅंगवर, खंडणी वसुली यातून व्यापारी यांच्यावर गोळी व खुनाच्या घटना घडल्या आहेत.