महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त नांदेड शहरात भव्य मिरवणुकीसह सभेचे आयोजन

नांदेड

नांदेड,बातमी24:-क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती नांदेड शहरात प्रतिवर्षी शिवा संघटनेच्यावतीने अक्षय तृतीया च्या दिवशी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते. मिरवणुकीची सांगता जहिरसभेने होणार आहे.

शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे .ही भव्य मिरवणूक मंगळवारी दि.3 मे रोजी सायंकाळी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार असून डी.आयजी ऑफिसच्या चौकाजवळ सायंकाळी सात ते दहा या वेळामध्ये समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे. या समारोपीय कार्यक्रमात कार्यक्रमास गुरूपदेश म्हणून गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर, गुरुवर्य राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर ,गुरुवर्य डॉ. शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, गुरुराज स्वामी अहमदपूरकर यांच्यासह अनेक गुरुवर्य उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे तर उद्घाटक म्हणून विधानपरिषदेचे गटनेते आ.अमर राजूरकर हे उपस्थित राहणार आहेत .प्रमुख अतिथी म्हणून माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर माजी मंत्री डी पी सावंत ,विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, आ.मोहन अण्णा हंबर्डे , आमदार बालाजीराव कल्याणकर , आ.डॉ.तुषार राठोड, आ. माधवराव पाटील जवळगावकर आ.जितेश अंतापुरकर, मा.आ.वसंतराव चव्हाण , माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्रीताई पावडे ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर ,विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर ,मनपा आयुक्त सुनील लहाने, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथ मोरे, भाजपाचे महानगरप्रमुख प्रवीण साले, माजी पं.स. सभापती बालाजी पांडागळे ,बालाजी बंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबनराव बारसे, राज्य सरचिटणीस विठ्ठलराव ताकबिडे ,मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे ,जिल्हा संपर्कप्रमुख इंजि.अनिल माळगे ,शिव कीर्तनकार मन्मथ आप्पा डांगे हे उपस्थित राहणार आहेत. तरी मिरवणूक व जहिरसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे महात्मा बसेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे , स्वागत अध्यक्ष , माजी सभापती संजय बेळगे ,कमिटी कार्याध्यक्ष तथा शिवा संघटनाराज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोंनसुरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील , शंकर पत्रे,दिगंबर मांजरमकर ,विरभद्र बसापुरे, जी.एस.मंगनाळे, संभाजी पावडे यांनी केले.