दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- कोरोनामुळे कंबरडे मोडलेले असताना त्यात पेट्रोल व डिझेल दरवाढ सामन्याच्या खिशाला टाच बसणारी ठरत आहे. या निषेधार्त काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.29 जुन रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना देण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रवक्ते संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देताना उपरोक्त पदाधिकार्‍यांसह प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बी.आर.कदम, जि.प.चे कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,स्थायी समितीचे सभापती अमित तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, माजी जि.प.अध्यक्ष दिलिप पा.बेटमोगरेकर, ओ.बी.सी.चे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सुरेंद्र घोडजकर,बाजार समिती सभापती संभाजी पुयड,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पावडे, प्रफुल्ल सावंत, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे,बापूराव गजभारे आदींची उपस्थिती होती.