आज होणार 9 हजार वटवृक्षांची लागवड: -सीईओ वर्षा ठाकूर यांचा उपक्रम

कृषी

नांदेड, बातमी24- वटपौर्णिमेनिमित्त आज मंगळवार दिनांक 14 जून रोजी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात सुमारे 9 हजार 176 वडवृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती नादेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडी मध्ये जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार 739 शाळा, अंगणवाडी- 3 हजार 775, प्राथमिक आरोग्य केंद्र- 68, उपकेंद्र- 379 व 1 हजार 310 ग्रामपंचायतीमधून सुमारे 9 हजार 176 वडवृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
गट विकास अधिकारी यांच्यासह नियंत्रणात गट शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उप अभियंता, विस्‍तार अधिकारी यांच्यासह तालुकास्तरावरील खातेप्रमुखांनी त्यांच्या विभागाची जबाबदारी घेऊन वृक्ष लागवड करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.
*चौकट*
जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ह्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांनी अनेक नवे उपक्रम जिल्‍हयात राबविले आहेत. वटपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे नऊ हजार वृक्षांची लागवड पहिल्यांदाच केली जात आहे. या उपक्रमामुळे गावागावात वडाची लागवड केली जाणार आहे. आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. याशिवाय वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडते.