चार रुग्णांची वाढ; दोन रुग्ण बरे

ताज्या बातम्या नांदेड

 

नांदेड,बातमी24;- कोरोनाच्या दृष्टीने रविवार व सोमवार समाधानकारक ठरला आहे. सोमवारी नव्याने 4 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संख्या 371 झाली आहे.तर दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले.

सोमवारी देगलूरनाका येथील 55 पुरुष, 53 वर्षीय पुरुष नवा कोठा,बाफना रोडवरील 60 वर्षीय महिला तसेच मुखेड येथील 55 वर्षीय
पुरुषाचा समावेश आहे.
——-
चौकट
जिल्ह्यातील रुग्णसंख्या -371
कोरोना मुक्त संख्या-281
उपचार घेत असलेले रुग्ण-74

मरण पावलेले रुग्ण संख्या-16